शाब्बास वरोरा पोलीस!

 ... शाब्बास वरोरा पोलीस!


वरोरा पोलिसांची धडाकेबाज कारवाई; 



आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश





वरोरा (प्रती)वरोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या सोन्याच्या फसवणुकीच्या गुन्ह्याचा अवघ्या काही दिवसांत छडा लावत पोलिसांनी आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला असून तीन आरोपींना अटक करण्यात यश मिळवले आहे. दुसऱ्या घटनेत स्कार्पियोच्या स्टेपनेतून एमडी ड्रग्स जप्त केले असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. आंतरराज्य टोळी च्या या कारवाईत सुमारे ₹६,२०,००० किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

दि. ०२/०६/२०२६ रोजी फिर्यादी  नथ्थु साधोजी दडमल (वय ६२, रा .वरोरा) यांनी पोलीस ठाणे वरोरा येथे तक्रार दाखल केली होती. फिर्यादी यांच्या घरी दोन अनोळखी इसमांनी येऊन “भांडी चमकवून देतो” असे सांगत विश्वास संपादन केला. त्यानंतर हातचलाखीने फिर्यादी यांच्या गळ्यातील सुमारे १५ ग्रॅम वजनाचा, अंदाजे ₹१,५०,००० किमतीचा सोन्याचा गोफ लंपास करून आरोपी फरार झाले.

या तक्रारीवरून पोलीस ठाणे वरोरा येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक ७२१/२६, कलम ३१८(४) बी.एन.एस. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणेदार पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाने प्रमुख शरद भस्मे (एपीआय) व डीबी पथकाने तातडीने तपास सुरू केला. पथकाने वरोरा शहरासह चंद्रपूर शहरातील तब्बल २०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी चंद्रपूर शहरात वास्तव्यास असल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून दोन दिवस आरोपींच्या हालचालींवर पाळत ठेवली आणि अत्यंत शिताफीने तीन आरोपींना अटक केली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे 

१) मो. आरिफ मो. बरखत अली, वय ४२ वर्ष

२) निर्दोष बद्रीप्रसाद गुप्ता

(दोन्ही रा. मथुरापुर, ता. बिहपुर, जि. भागलपूर, बिहार)

३) पंकजकुमार सुखदेव शाह, वय ४३ वर्ष

रा. जमुनिया, ता. नवगछिया, जि. भागलपूर, बिहार

चौकशीदरम्यान आरोपींनी वरोरा, बल्लारशाह, सावली, घुग्गुस, राजुरा तसेच इतर जिल्ह्यांमध्येही अशाच प्रकारचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.

आरोपींकडून खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे

• १५ ग्रॅम सोन्याचा गोफ – ₹१,५०,०००

• २ सोन्याचे डोरले व कानातले – ₹५०,०००

• ४ सोन्याच्या अंगठ्या (अंदाजे २० ग्रॅम) – ₹२,६०,०००

• २ सोन्याचे डोरले – ₹६०,०००

• गुन्ह्यात वापरलेल्या २ मोटारसायकली – ₹१,००,०००

एकूण जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे ₹६,२०,००० इतकी आहे.

ही संपूर्ण कारवाई चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या नेतृत्वात डी.बी. पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

वरोरा पोलिसांच्या या तत्पर व कौशल्यपूर्ण कारवाईमुळे परिसरात नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.





*वाहनाच्या स्टेपनीत लपवलेले ५.५८ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त* 



स्टेपनीमध्ये अत्यंत चलाखीने लपविण्यात आलेले एमडी ड्रग्ज पोलिसांनी जप्त करत मोठ्या कारवाईला यश मिळवले आहे. या प्रकरणात अटकेत असलेल्या संशयित आरोपी गुलाम गौस सिद्धीकी याला वरोरा न्यायालयाने ११ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

दिनांक ८ जून रोजी नागपूर–चंद्रपूर महामार्गालगत असलेल्या पद्मालयनगर परिसरात ही कारवाई करण्यात आली. संशयित आरोपीच्या घरासमोर उभी असलेली स्कॉर्पिओ (MH 34 CH 55) वाहनाची सखोल तपासणी करताना पोलिसांना स्टेपनीमध्ये लपवलेले ५.५८ ग्रॅम एमडी ड्रग्ज आढळून आले.

गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सकाळी सुमारे ११ वाजता घटनास्थळी धाव घेत तपासणी सुरू केली. वाहनाची झडती घेतल्यानंतर स्टेपनीमध्ये संशयास्पद पदार्थ आढळून आला. त्याची चाचणी केली असता तो एमडी ड्रग्ज असल्याचे स्पष्ट झाले.

या प्रकरणी पोलिसांनी वाहन, मोबाईल फोन आणि अमली पदार्थ जप्त केले असून आरोपीविरुद्ध नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस अॅक्ट १९८५ अंतर्गत कलम ८(अ) व २१(ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शरद भस्मे व त्यांच्या पथकाने संयुक्तरीत्या केली.

दरम्यान, आरोपी गुलाम सिद्धीकी यांनी या प्रकरणात आपला कोणताही संबंध नसल्याचा दावा करत, जुन्या वैमनस्यातून किंवा व्यावसायिक स्पर्धेतून आपल्याला जाणीवपूर्वक अडकविण्यात आल्याचा आरोप केला असून सखोल चौकशीची मागणी केली आहे.

९ जून रोजी आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्याला ११ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Post a Comment

0 Comments