शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध : आमदार करण देवतळे

 शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध : आमदार करण देवतळे


'विद्यानगरी हाऊसिंग सोसायटीत 'नमो उद्यान'चे भूमिपूजन





वरोरा (प्रति)वरोरा शहराचा सर्वांगीण विकास करणे आणि नागरिकांना उत्तम दर्जाच्या मूलभूत सुविधा पुरवणे हे आपले मुख्य ध्येय आहे. विद्यानगरी हाऊसिंग सोसायटीच्या ओपन स्पेसमध्ये साकारत असलेले 'नमो उद्यान' केवळ शहराच्या सौंदर्यात भर घालणार नाही. तर परिसरातील नागरिकांना स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी वातावरण उपलब्ध करून देणारे एक प्रमुख केंद्र ठरेल असे प्रतिपादन आमदार करण देवतळे यांनी केले.


विशेष अनुदान निधी २०२५-२६ अंतर्गत वरोरा नगर परिषद परिक्षेत्रातील


मौजा खांजी, सर्व्हे क्र. १६९/३ मधील विद्यानगरी हाऊसिंग सोसायटीच्या ओपन स्पेसमध्ये विकसित करण्यात येणाऱ्या 'नमो उद्यान'च्या कामाचे भूमिपूजन देवतळे यांच्या हस्ते संपन्न झाले, याप्रसंगी ते बोलत होते.


पुढे बोलताना देवतळे म्हणाले म्हणाले की, "वाढत्या शहरीकरणात नागरिकांच्या आरो ग्यासाठी आणि मानसिक विरंगुळ्यासाठी शहरात हरित क्षेत्रांची निर्मिती करणे अत्यंत आवश्यक आहे. हे उद्यान सर्व वयोगटातील नागरिकांसाठी, लहान मुलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनेल. येथे व्यायाम, पर्यावरण संवर्धन आणि विविध सामाजिक उपक्रमांना चालना दिली जाईल.


वरोरा मतदारसंघातील नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक सुधारणा घडवून आणण्यासाठी आणि शहराचा  चेहरामोहरा बदलण्यासाठी विकासाची ही वाटचाल भविष्यातही अशाच जोमाने सुरू राहील," अशी ग्वाही त्यांनी दिली.


या कार्यक्रमाप्रसंगी खासदार प्रतिभा धानोरकर, नगराध्यक्षा अर्चना ठाकरे, नग रसेविका योगिता नेरकर, वर्षा पिसाळ, नगरसेवक बंडू देऊळकर, मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम, नगर परिषद वरोरा), शंभूनाथ वरघणे, संतोष पवार, अक्षय भिवदरे, मंगेश पिसाळ यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, मान्यवर आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते

Post a Comment

0 Comments