परजिल्ह्यात शेती असलेल्या शेतकऱ्यांनाही पीक कर्ज द्या
करण देवतळे यांची विधानसभेत मागणी
वरोरा (प्रतिनिधी )
ज्या शेतकऱ्यांची शेती
परजिल्ह्यात आहे, परंतु ते चंद्रपूर जिल्ह्याचे रहिवासी आहेत, अशा शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास नकार दिला आहे. अशा सर्व शेतकऱ्यांनाही तातडीने पीक कर्ज देण्याची मागणी आमदार करण देवतळे यांनी पावसाळी अधिवेशनात केली.
वरोरा तालुक्यातील खांबाडा, नागरी, माढेळी, एकोणा या गावातील २०० हून अधिक शेतकऱ्यांची शेती लागूनच असलेल्या यवतमाळ व वर्धा जिल्ह्यात आहे. हे शेतकरी पिढ्यानपिढ्या तेथे शेती करत असून दरवर्षी नियमित कर्जफेडही करतात. मात्र, बँकेने अचानक कर्ज नाकारल्याने ऐन खरिपात शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.
आमदारदेवतळे यांनी यापूर्वी बँकेशी सातत्याने
पत्रव्यवहार केला, परंतु तोडगा न निघाल्याने त्यांनी हा प्रश्न थेट सभागृहात मांडून सहकार मंत्र्यांचे लक्ष वेधले. शासनाने यात तत्काळ हस्तक्षेप करण्याची मागणी केली. यासोबतच, शेतकऱ्यांनी भरलेल्या पीक विम्याचा मुद्दाही आमदार देवतळे यांनी लावून धरला.२०२२ पासून अनेक शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणींचे कारण पुढे करून पीक विम्याची हक्काची रक्कम मिळालेली नाही.
प्रशासनाने या तांत्रिक त्रुटी तत्काळ दूर करून शेतकऱ्यांना विम्याची रक्कम सुपूर्द करावी, अशी मागणीही त्यांनी सभागृहात केली. सरकार काय निर्णय घेते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष

0 Comments