भाजपा तालुका पक्ष कार्यालयाचे आज भव्य उद्घाटन
जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या हस्ते होणार उद्घाटन
वरोरा (प्रती)लोकहिताची कामे अधिक प्रभावीपणे मार्गी लावणे तसेच राज्य शासनाच्या विविध योजना व सुविधा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने वरोरा विधानसभा क्षेत्राचे आमदार करण देवतळे यांच्या जनसंपर्क कार्यालय तसेच भारतीय जनता पक्षाच्या भव्य कार्यालयाचा शुभारंभ सोहळा ४ जुलै रोज शनिवारला सायंकाळी ४ वाजता होत आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष हरिश शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाला माजी केंद्रीय राज्यमंत्री
हंसराज अहिर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. भाजपच्या या पक्ष कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे आदिवासी विकास तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्या शुभहस्ते होणार आहे. सहकार महर्षी स्वर्गीय दादासाहेब देवतळे जिनिंग प्रेसिंग सोसायटीच्या
परिसरात होणाऱ्या या पक्ष कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी बल्लारपूरचे आमदार सुधीर मुनगंटीवार, चिमूरचे आमदार बंटीभाऊ भांगडीया, चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार, राजुऱ्याचे आमदार देवराव भोंगळे, विधान परिषदेचे आमदार अरुण लखानी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. पक्ष कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याला भाजपाच्या समस्त पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन शहर भाजपा अध्यक्ष संतोष पवार, वंदना दाते, राजेंद्र सवई, श्यामसुंदर उरकुडे व दयानंद जांभुळे यांनी केले आहे.
.jpg)
0 Comments