ठाणेदार म्हणतात अवैध धंदे बंद! मग अवैध धंद्यांना मुभा देणारे ते 'त्रिदेव' कोण..?

 ठाणेदार म्हणतात अवैध धंदे बंद!

मग अवैध धंद्यांना मुभा देणारे ते 'त्रिदेव' कोण..?



चंद्रपूर/ बल्लारपूर(नरेंद्र सोनारकर):जिल्ह्यात संवेदनशील शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बल्लारपूर तालुक्यात ठाणेदार म्हणून जबाबदारी स्वीकारलेल्या विपीन इंगळे यांनी इथे पदभार स्वीकारल्या बरोबर येथील गुन्हेगारीवर लगाम लावण्यात बऱ्यापैकी यश मिळवले.त्यातच त्यांच्या निदर्शास आलेले अवैध धंदे पूर्णपणे बंद करण्यास पुढाकार घेतला.सट्टा मटका,अवैध जुगार अड्डे,अवैध दारू दुकाने यावर धाडी टाकून गुन्हे दाखल करून पोलिसी हिसका दाखवत 'फुल एन्ड फायनल' वॉर्निंग देत कार्यवाही केली होती...बल्लारपूरात कायद्याची सुरक्षा करत 'जन रक्षणाय, खल निग्रहणाय' भूमिका घेणाराच ठाणेदार इंगळे साहेबांच्या रूपात मिळाल्याची प्रतिक्रिया सामान्य नागरिकांनी व्यक्त केली होती.पण काही दिवसात अवैध धंद्यांनी डोके वर केले.विशेष सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार या अवैध धंदेवाल्यांना मॅनेज करण्याचे काम बल्लारपूर पोलिसस्टेशन मध्ये कार्यरत 'त्रिदेव' करत आहे.ठाणेदारांच्या नजरेत धूळ फेक करून अवैध वसुलीतून हे त्रिदेव मालामाल होत असल्याची माहिती आहे.



कुठे सुरु आहेत अवैध धंदे..?

शहरातील मेनरोड वरील अवैध धंद्यांना ठाणेदार विपीन इंगळे यांनी बंद केल्या नंतर या त्रिदेव तिकडीवर आर्थिक दुष्काळ ओढवला होता.त्याच नुकसान भरपाई साठी येथील त्रिदेव तिकडीने शहरातच नव्हे तालुक्यात अवैध धंदेवाल्यांशी तडजोड करून हप्तावसुली सुरु केल्याची विश्वस्नीय माहिती आहे.त्यात आदर्श ग्राम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बामणी येथील मेनरोडवरच दोन ते तीन अवौढ दारू दुकाने बिंदिक्कत सुरु आहे.या गावात एकूण ८-१० अवैध दारू दुकाने सुरु असल्याची माहिती आहे.विसापूर या गावात मध्यभागी देशी विदेशी दारूचे दुकान थाटल्या गेले आहे.येथेही ३-४ अवैध दारू दुकाने आहेत.तालुक्यातील अनेक गाव खेड्यात हे अवैध दारू दुकाने पोलिसांच्या अलिखित परवानगीने सुरु असून याची माहिती मात्र ठाणेदार इंगळे साहेबांना पुरवण्यात येत नाही.बल्लारपूर शहरातर असा एकही वॉर्ड नसेल जिथे अवैध दारू विकल्या जात नाही.प्रत्येक वॉर्डात ७-८ अवैध दारू दुकाने सहज बघायला मिळतील.टेकडी परिसरात तर या अवैध दारू विक्रेत्यांनी परवाना धारकाला लाजवावे असे दारू दुकाने थाटले आहेत.पण यांना पोलिसांची अजिबाद भीती वाटत नाही.कारण "आम्ही पैसा देतो,म्हणून धंदा करतो" असा यांचा वरचा सूर असून यामागे पोलीस स्टेशन मधील त्या त्रिदेवांचे 'मधुर अर्थपूर्ण' संबंध निर्माण झाल्यानेच या अवैध धंद्यांना अभयदान दिले जात आहे.



कर्तव्यदक्ष ठाणेदार इंगळे या त्रिदेवावर कार्यवाही करतील का..?

एकीकडे अवैध धंदे बंद असल्याचे भासवून ठाणेदाराच्याच डोळ्यात धूळ फेक करून या अवैध धंदेवाल्यां कडून हप्ता वसुली करणाऱ्या या त्रिदेवांचे पितड उघडे पाडण्यासाठी ठाणेदारांनी स्वतःच सूत्र हातात घेऊन सुरु असलेल्या अवैध धंध्यांच्या चालकांवर कार्यवाही करून कायदेशीर भाषेत "तुम्ही कुणाला किती हप्ता देता?" असा प्रश्न विचारल्यास नक्कीच या त्रिदेवांच्या चेहऱ्यावरील कथित 'कर्तव्य दक्षतेचे मुखवटे' गडून पडल्या शिवाय राहणार नाही.

--------------------------------


जिल्ह्यात बल्लारपूर शहर हे संवेदनशील शहर म्हणून ओळखले जात असले तरीही येथील अवैध धंद्यांनी या शहराला अधिकच विद्रुप केले आहे.दरम्यान शहरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे गतिमान झाले असतांना राजकीय,समाजिक,संस्कृतिक दृष्ट्या या अवैध धंद्यावर प्रतिबंध आणणे हाच एकमेव उपाय असल्याचे जागृत नागरिकांचे मत आहे.

Post a Comment

0 Comments