प्रभाग क्र. १० मधून राष्ट्रवादीचे 'घड्याड' १० वाजून १० मिनटे दाखवणार!
बल्लारपूर(नरेंद्र सोनारकर):स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीने भर हिवाळ्यात वातावरण चांगलेच तापत चालले असून एकीकडे भाजप- काँग्रेस या बड्या राष्ट्रीय पक्षांना उमेदवारी द्यायची कुणाला असा पेच निर्माण झाला असतांना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) ने ठरलेले उमेदवार जाहीर केल्याने
प्रभाग क्र १० मध्ये राष्ट्रीय काँग्रेस आणी भारतीय जनता पार्टीच्या सम्भवीत उमेदवारांना घाम फोडत राष्ट्रवादीचे उमेदवार सुमित (गोलू) डोहने आणि उमेदवार साजिया शाहिद शेख यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.या निवडणूक प्रक्रियेला निवडणूक आयोगाने खूप कमी दिवस दिल्याने तथा ऑनलाईन प्रक्रियेतून अनेक कागद पत्रांची पूर्तता करून फॉर्म भरायचा असल्याने अनेक इच्छुक भावी नगर सेवक या स्पर्धेतून बाद होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.त्यातच कागदपत्रांची चौकशी करून तिकिटा वाटप करायच्या असल्याने भाजप आणी राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार अध्याफी जाहीर करण्यात आले नाही.दरम्यान गेली अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या सुमित उर्फ गोलू उराडे यांनी 'डोर टू डोर' भेटी घेऊन असलेला जनतेचा पाटींभा अधिक भक्कम करत जनसम्पर्क वाढवला आहे.त्यातच जमेची बाजू अशी सहयोगी उमेदवार साजीदा शेख यांच्ये पती शाहिद शेख यांचे या प्रभागामध्ये गेली काही वर्षा पासून सामाजिक काम सुरु आहे.जनतेची भक्कम साथ,समाजिक कार्यामुळे तयार झालेली मोठी मतदार संख्या,युवा कार्यकर्त्यांची मोठी फडी त्यामुळे या प्रभाग क्रमांक १० मधून राष्ट्रवादीचे 'घड्याड' विजयाचे १० वाजून १० मिनिटे निश्चित करणार असल्याचे एकंदरीत चित्र आहे...

0 Comments