प्रभाग ११ (ब) मध्ये अभय ठावरींची जोरदार चर्चा सामाजिक–राजकीय कर्तृत्वावर जनता प्रभावित

 प्रभाग ११ (ब) मध्ये अभय ठावरींची जोरदार चर्चा सामाजिक–राजकीय कर्तृत्वावर जनता प्रभावित



वरोरा (प्रतिनिधी) प्रभाग ११ (ब) मधील आगामी नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून अभय वामनराव ठावरी यांचे नाव सध्या प्रबळ दावेदार म्हणून पुढे येत आहे. सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या ठावरींना प्रभागात जनतेचा ठोस कौल मिळत असल्याची चर्चा विविध ठिकाणी रंगत आहे.


अभय ठावरी यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले असून, धार्मिक–सांस्कृतिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग हे त्यांच्या कार्याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. गणेशोत्सव, दुर्गा उत्सव तसेच महापुरुषांच्या जयंती उत्सवांमध्ये ते हिरिरीने कार्य करीत आले आहेत. समाजाच्या विविध घटकांपर्यंत पोहचणारे त्यांचे कार्य प्रभागात आदराने उल्लेखले जाते.


त्यांच्याकडे भक्कम राजकीय वारसाही आहे. त्यांची आई सौ. शोभा वामनराव ठावरी या 2001 ते 2006 या कार्यकाळात नगरपरिषदेच्या नगरसेवक होत्या तसेच शिक्षण सभापती म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली होती. त्याच वारशातून आज अभय ठावरी प्रभागात प्रभावी नेतृत्व म्हणून उभे राहत आहेत.


व्यावसायिक क्षेत्रातही त्यांची दमदार उपस्थिती आहे. पूर्वी पोस्ट ऑफिसमध्ये एजंट म्हणून काम करताना त्यांनी नागरिकांचा विश्वास संपादन केला. सध्या ते श्री रंगनाथ स्वामी बँकेत अभिकर्ता म्हणून कार्यरत असून विटांच्या व्यवसायातूनही त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. तसेच गांधी उद्यान योग मंडळ, वरोरा येथील सक्रिय सदस्यत्वातून ते आरोग्यवर्धक व सामाजिक उपक्रमात सहभागी राहतात.


राजकीय जाण, सामाजिक समर्पण आणि जमिनीवरची कार्यशैली यामुळे ठावरी हे प्रभाग ११ (ब) मधील एक सक्षम आणि लोकाभिमुख नेतृत्व म्हणून उदयास येत असल्याचे मत स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. अनेकांच्या मते, भक्कम मतांच्या जोरावर ते विजयाची नोंद करतील अशी दाट शक्यता आहे.


प्रभागात सध्या सुरू असलेल्या चर्चेनुसार, “अभय ठावरी यांच्याकडेच जनतेचा विश्वास झुकत आहे” अशी स्पष्ट भावना उमटताना दिसत आहे.

Post a Comment

0 Comments