बंडूभाऊ देऊळकरांकडे मतदारांचा वाढता कल; सर्वधर्मसमभावी कार्यकर्त्याच्या विजयाच्या चर्चा जोरात
वरोरा (प्रती)प्रभाग क्रमांक २ (अ) मधून काँग्रेसच्या तिकिटावर उभे असलेले बंडूभाऊ देऊळकर यांच्याकडे यंदाच्या नगरपरिषद निवडणुकीत मतदारांचा स्पष्ट कल दिसत आहे. सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळख असलेल्या देऊळकर यांनी २०११ साली शिवसेनेच्या उमेदवार म्हणून प्रभाग प्रणालीतील निवडणूक लढवली होती. त्या वेळी अगदी अल्प मतांनी त्यांचा पराभव झाला होता. मात्र, यंदा त्यांच्या सातत्यपूर्ण कार्यामुळे मतदार पुन्हा एकदा त्यांना संधी देण्याच्या मूडमध्ये असल्याचे चित्र आहे.
देऊळकर यांची सामाजिक पार्श्वभूमी भक्कम असून, ते सुख-दुःखात लोकांना धावून जाणारे कार्यकर्ते म्हणून प्रभागात प्रसिद्ध आहेत. रुग्णांना वैद्यकीय मदत उपलब्ध करून देणे, स्वखर्चातून उपचारासाठी हातभार लावणे, तसेच आपत्कालीन सेवांमध्ये तत्परतेने मदतीचा हात देणे यामुळे नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वास निर्माण झाला आहे. रोटरी क्लबचे अध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक उपक्रम राबवले, तर रेल्वे प्रवासी संघाच्या माध्यमातून नागरिकांना सुविधा मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले.
क्रीडा क्षेत्रातही देऊळकर यांचे योगदान लक्षणीय असून, त्यांनी तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठीही विशेष प्रयत्न केले आहेत. कोरोना काळात अठरा वर्षांखालील ज्यांचे पालक निधन पावले अशा मुलांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचे त्यांनी हाती घेतलेले कार्य विशेष उल्लेखनीय ठरले.
देऊळकर यांची सर्वधर्मसमभावाची तत्वनिष्ठ भूमिका, गोरगरीब व वंचित घटकांना मदत करण्याची वृत्ती आणि सातत्याने केलेले सामाजिक काम यामुळे प्रभागात त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. आगामी २ डिसेंबर रोजी होणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीत देऊळकर यांचा विजय निश्चित असल्याचे स्थानिक स्तरावर बोलले जात असून, त्यांच्या प्रचाराला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
सभ्य, संयमी आणि विकासाभिमुख कार्यकर्ते म्हणून बंडूभाऊ देऊळकर या निवडणुकीत प्रबळ दावेदार ठरत आहेत.

0 Comments