बालकाच्या मृत्यूला जबाबदार श्री विदर्भ मल्टी सर्विसेसला ब्लॅक लिस्ट मध्ये टाका
नवनिर्वाचित 14 नगरसेवकांची मागणी
निवेदनातून दिला आंदोलनाचा इशारा
वरोरा( प्रतिनिधी) येथील नगरपरिषद क्षेत्रातील पाणीपुरवठा करणाऱ्या श्री विदर्भ मल्टीसर्विसेस कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे एका चार वर्षीय बालकाचा दूषित पाणी पिल्याने मृत्यू झाला शवविच्छेदन अहवालानंतर सदर कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे सदर कंपनीचे काम अयोग्य असल्याचे सिद्ध झाले असून या कंपनीची नगरपरिषद क्षेत्रातील सर्व कामे रद्द करून तिला काळ्या यादी टाकावे अशी मागणी भाजपाचे गटनेते अक्षय भिवदरे त्यांच्यासह १३ नगरसेवकांनी नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांकडे २२ जानेवारीला निवेदनातून केली आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्र्यांसह स्थानिक आमदार व सर्व संबंधितांना पाठविल्या असून योग्य कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.
वरोरा नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा योजनेची देखभाल दुरुस्ती व शुद्ध पाणी पुरवठ्याची कामे मागील अनेक वर्षापासून श्री विदर्भ मल्टीसर्विसेस कंपनी करीत आहे दीड वर्षांपूर्वी दूषित पाणी पुरवठ्यामुळे मालवीय वार्डातील एका चार वर्षीय बालकाचा मृत्यू झाला तसेच अनेकांना साथीच्या रोगाची लागण होऊन शहरात आरोग्याची समस्या बिकट झाली होती. दीड वर्षांपूर्वी मृत्युमुखी पडलेल्या चार वर्षे बालकाचा शवविच्छेदन अहवाल १२ जानेवारीला प्राप्त झाला असून या अहवालात सदर बालकाचा मृत्यू हा दूषित पाणी पिल्यामुळे झाला असून कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला परंतु नगरपरिषद प्रशासनाने याची दखल घेऊन अजून पर्यंत कोणतेही कारवाई केलेली नाही ही अतिशय संतापजनक बाब आहे परिणामी पुढे होणाऱ्या संभाव्य अप्रिय घटना टाळण्याकरिता श्री विदर्भ मल्टीसर्विसेस कंपनीचा नगर परिषदेसोबत असलेला सर्व प्रकारच्या कामाचा करारनामा त्वरित रद्द करून संपुष्टात आणावा सदर कंपनीचे नगरपरिषद कार्यालयाकडे असलेले देयके (बिल) व सुरक्षा गोठून पालिका फंडात जमा करावी आणि सदर कंपनीला त्वरित काळ्या यादीत टाकावे व तसा विषय पुढील सर्वसाधारण सभेत विषय सूचीवर घेण्यात यावा अशी मागणी नगरसेवकांनी निवेदनातून केली आहे सदर मागण्यांवर गांभीर्याने विचार करून सकारात्मक निर्णय न झाल्यास नागरिकाच्या जीवाशी खेळणाऱ्या कंपनी व नगरपरिषद प्रशासनाविरुद्ध तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे .
यावेळी अक्षय भिवदरे, खेमराज कुरेकर ,संतोष पवार, प्रवीण चिमूरकर, कुणाल रुयारकर, शंभूनाथ वरघणे,नलिनी आत्राम, वर्षा पिसाळ, लीना गयनेवार ,आशा आसेकर, मनीषा दानव, सीमा तडस ,लता हिवरकर, नुपूर तेला आदी उपस्थित होते

0 Comments