आनंदवनातील दिव्यांगानी शतप्रतिशत निकालाची परंपरा कायम राखली.
वरोरा (प्रती)दिव्यांगाचे सर्वांगीण विकासाचे दृष्टीने महर्षी बाबा आमटे यांच्या महारोगी सेवा समिती, वरोरा चे कार्य सर्वश्रुत आहेच. आनंदवनात अंध शाळा,मूकबधिर शाळा चे माध्यमातून शालेय शिक्षण व संधि निकेतन कर्म शाळेच्या माध्यमातून व्यवसाय प्रशिक्षण देऊन आत्मनिर्भर केले जात आहे. दिव्यांगांचे सक्षमीकरण करताना व्यावसायिक प्रशिक्षणा सोबतच त्यांचा औपचारिक शिक्षण प्रवाह देखील मुख्य प्रवाहात अखंडित पणे सुरु रहावा या हेतूने महारोगी सेवा समिती, वरोरा संचालित संधिनिकेतन अपंगांची कर्मशाळा, आनंदवन अंतर्गत निजबल शिक्षा निकेतन या संस्था स्वयंचलित उपक्रमा द्वारे सन 2018 पासून अंध, कर्णबधिर व अस्थिव्यंग विद्यार्थ्यांना बोर्डाच्या खाजगी परीक्षा योजने अंतर्गत (१७ नंबर फॉर्म द्वारे) एच. एस. सी.चे शिक्षण येथे विनामुल्य दिले जाते. यावर्षी १७ कर्णबधिर, ०२ अंध व ०२ अस्थिव्यंग असे एकूण २१ दिव्यांग विद्यार्थी १२ वी च्या परीक्षेला बसले. त्या सर्वांनी उत्तम यश संपादित करीत १००% निकाल आणलेला आहे. यात प्रथम स्थानी कु. नैना पत्रकार (अंध), द्वितीय स्थानी कु. श्रुतिका उइके (अस्थिव्यंग) तर तृतीय स्थानी कु. विधी डोंगरकर ( अंध) यांनी क्रमांक पटकावला आहे. विद्यार्थ्यांचे लेखनिक म्हणून आनंद निकेतन महाविद्यालयातील इयत्ता अकरावी sci . चे विद्यार्थ्यांचे महत्वाचे सहकार्य लाभले. महाविद्यालयाचे माजी उप प्राचार्य सौ. राधा सवाने यांचे बहुमोल मार्गदर्शन व सहकार्य या कार्याला विशेष बळ देणारे ठरले.
निजबल शिक्षा निकेतन चे व्यवस्थापक रवींद्र नलगिंटवार यांचे नेतृत्वात प्रवीण ताठे, इक्राम पटेल, सौरव वानखेडे (कर्णबधिर शिक्षक), हर्षल चौधरी, प्रणित भेले, या विषय शिक्षकांनी मेहनत घेतली. सदर यशाकरीता संस्थेचे सचिव डॉ. विकास आमटे, डॉ. भारती आमटे, संस्था कार्यवाह कौस्तूभ आमटे, सौ. पल्लवी आमटे, डॉ. विजय पोळ, सुधाकर कडू,सदाशिव ताजने,माधव कवीश्वर यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आणि पुढील शैक्षणिक वाटचाली करिता शुभेछ्या दिल्या
.jpg)
0 Comments