खांबाडा येथे ५लाखाचे एमडी ड्रग्जजप्त

 खांबाडा येथे ५ लाखाचे एमडी ड्रग्ज जप्त 


एक आरोपी अटकेत दोघे फरार 


चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 




वरोरा (प्रति)स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस स्टेशन वरोरा हद्दीतील मौजा खांबाडा येथे सापळा रचून एका युवकास ताब्यात घेण्यात आले. आरोपीची झडती घेतली असता त्याच्याकडून १०१ ग्रॅम एमडी ड्रग्ज पावडर जप्त करण्यात आली. या अमली पदार्थाची अंदाजे किंमत ५ लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपीकडून एक मोबाईल फोन तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोपेड असा एकूण ५ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अमित कृष्णा गजभिये (वय २३, रा. इंदोरा, नागपूर) असे आहे. तर या प्रकरणातील फरार आरोपी म्हणून हर्षल टेंभेकर (रा. इंदोरा, नागपूर) व सोहेल शेख (रा. चंद्रपूर) यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

सदर प्रकरणी पोलीस स्टेशन वरोरा येथे आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क), २२(क) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि विनोद भुरले, पोउपनि सुनिल गौरकार, पोहवा सुभाष गोहोकार, पोहवा सतिश अवथरे, पोहवा रजनिकांत पुठ्ठावार, पोहवा दिपक डोंगरे, पोहवा इम्रान खान, पोअं हिरालाल गुप्ता, पोअं किशोर वाकाटे, पोअं शशांक बदामवार, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर तसेच पोहवा कार्तिक खनके, पो. अ. अनिमेश भोंगळे व सायबर पोलिस स्टेशन चंद्रपूरच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

Post a Comment

0 Comments