बारावी नंतर दहावी परीक्षेत ही आनंदवनातील दिव्यांग शत प्रतिशत यशस्वी

 बारावी नंतर दहावी परीक्षेत ही आनंदवनातील दिव्यांग शत प्रतिशत यशस्वी 



वरोरा (प्रती )महारोगी सेवा समिती वरोरा संचालित निजबल शिक्षा निकेतन अंतर्गत आनंदवन येथे  दिव्यांग व्यक्तींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गेल्या तीन दशकाहून अधिक कालावधी पासून  बोर्डाच्या खाजगी विद्यार्थी परीक्षा योजने अंतर्गत (१७ नं. फॉर्म)  दिव्यांग विद्यार्थ्यांना दहावी परीक्षेला बसविले जाते. सदर विद्यार्थ्यांना विनामूल्य निवासी सुविधेसह नियमित शिकवणी वर्ग ही घेतले जाते. यावर्षी  इयत्ता दहावी परीक्षेला २२ कर्णबधिर , ७ अंध  असे एकूण २९ दिव्यांग विद्यार्थी परीक्षेला बसले होते. 

सर्व विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करीत १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली .परीक्षेला बसलेल्या २९ पैकी ११ विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर १७ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. यात कु. गायत्री प्रवीण मत्ते या कर्णबधिर विद्यार्थिनीने ६५.६० टक्के गुण मिळवित प्रथम स्थान पटकावले तर  रोशन बबन पोहनकर या विद्यार्थ्याने ६३.८० टक्के गुण मिळवित द्वितीय स्थान पटकावले. तसेच अंध प्रवर्गातून आकाश शंकर मन्ने याने ६२.०० टक्के गुण संपादन केले. 

या शैक्षणिक उपक्रमास व्यवस्थापकीय अधिक्षक श्री. रवींद्र नालगिंटवार, उपक्रम समन्वयक व विशेष शिक्षक  श्री. इक्राम पटेल, श्री. प्रवीण ताठे, श्री सौरव वानखेडे, श्री गणेश जायनाकर, श्री. रमेश बोपचे, श्री. प्रणित भेले या शिक्षकांसोबत श्री. प्रशांत गवई कला शिक्षक यांनी विशेष मेहनत घेतली. 

अंध विद्यार्थ्यांचे लेखनिक म्हणून आनंद माध्यमिक विद्यालय ,आनंदवन व लोकमान्य विद्यालय, वरोरा येथील अनुक्रमे नववी व सहावी चे विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. परीक्षा व पूर्व तयारी करीता श्री. राखे सर, मुख्याध्यापक लोकमान्य विद्यालय, वरोरा यांचे सह शाळेतील शिक्षकांचे व कर्मचाऱ्यांचे बहुमूल्य योगदान व मार्गदर्शन प्राप्त झाले. सदर  यशा करीता संस्थेचे सचिव व मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. विकास आमटे, डॉ. भारती आमटे, कार्यकारी विश्वस्त श्री. कौस्तुभ आमटे,  संस्थंतर्गत व्यवस्थापिका सौ. पल्लवी आमटे, डॉ. विजय पोळ,विश्वस्त, श्री. सुधाकर कडू , श्री. सदाशिव ताजने, श्री.माधव कवीश्वर यादी मान्यवरांसह आनंदवन वासियांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षकाचे अभिनंदन केले.. तसेच पुढील वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या.💐💐

Post a Comment

0 Comments