सीईटी परीक्षेत चमकला वरोऱ्याचा मोहक चवले
वरोरा : बारावीच्या सीईटी परीक्षेत १०० टक्के परसेंटेज मिळवून वरोरा येथील मोहक संदीप चवले याने महाराष्ट्रातील पहिल्या १२ अव्वल विद्यार्थ्यांमध्ये स्थान पटकावले आहे. त्याच्या या अभूतपूर्व कामगिरीमुळे वरोरा शहराच्या वैभवात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
शहरातील 'एक्सीलंट अकॅडमी'चा विद्यार्थी असलेल्या मोहकची घरची परिस्थिती सर्वसाधारण आहे. पहिल्या प्रयत्नात अपयश आले तरी खचून न जाता त्याने दुप्पट जोमाने अभ्यास केला आणि दुसऱ्या प्रयत्नात राज्यात अव्वल येण्याचा बहुमान मिळवला. अकॅडमीचे संचालक अभय टोंगे यांनी मोहकच्या तल्लख बुद्धीचे कौतुक केले. मोहकने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील आणि एक्सीलंट अकॅडमीच्या शिक्षकांना दिले.
.jpg)
0 Comments