इरई नदीच्या पुलावरून कार कोसळली

 इरई नदीच्या पुलावरून कार कोसळली


एक ठार चार जखमी : चंद्रपूर-नागपूर मार्गावरील घटना 


(चंद्रपूर /वरोरा प्रती)बुधवारी रात्री चंद्रपूर शहराजवळील इरई नदीच्या पुलावर एक



भीषण रस्ते अपघात घडला. भरधाव वेगात असलेल्या एका कारने नियंत्रण गमावले आणि पुलाचे कठडे तोडून ती थेट नदीत कोसळली. कारमधील


पाच जण गंभीर जखमी झाले, त्यापैकी एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. मृताची ओळख तुषार पोडे अशी पटली आहे. तो चालकाच्या शेजारी गाडीच्या


सीटवर बसला होता. अपघातात जखमी झालेल्या इतर चार जणांवर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, MH-34 CJ-2106 क्रमांकाची कार चंद्रपूरहून नागपूरकडे जात होती. बुधवारी रात्री सुमारे १० वाजता, इराई नदीच्या पुलावर चालकाचे अचानक वाहनावरील नियंत्रण सुटले, त्यामुळे कारने पुलाचे कठडे तोडले आणि ती खाली नदीत कोसळली. कारमध्ये चालकासह एकूण पाच जण होते. वाहनातील एअरबॅग प्रणालीमुळे मोठी जीवितहानी टळली, मात्र सर्व प्रवासी जखमी झाले. मृताच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.


त्याची प्रकृती चिंताजनक होती. उपचारासाठी नागपूरला नेत असताना त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी मदत आणि बचाव कार्य सुरू केले आणि जखमींना तातडीने शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. रामनगर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Post a Comment

0 Comments